पोस्ट्स

उद्योजक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझ्या उद्योजकतेचा प्रवास – एक न संपणारी जिद्द

इमेज
उद्योजक होण्याचं स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नाची किंमत फक्त संघर्षच ठरवतो." माझ्या उद्योजकतेच्या प्रवासाची सुरुवात झाली ती एका स्वप्नातून! स्वतःचं काहीतरी मोठं करायचं, स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं विश्व उभं करायचं—हे माझ्या मनात खोलवर रुजलेलं होतं. पण जसा जसा हा प्रवास पुढे सरकत गेला, तसं कळत गेलं की उद्योजकता म्हणजे फक्त मोठ्या कल्पना आणि मेहनत नव्हे, तर अपयश पचवण्याची आणि सतत उभं राहण्याची क्षमता असते. हा प्रवास रोमांचकही होता आणि मनाला घायाळ करणारा देखील. पहिला प्रयत्न – NationGuru.com (2015-2017) 2015 मध्ये मी NationGuru.com या प्लॅटफॉर्मच्या संकल्पनेवर काम सुरू केलं. ही संकल्पना गिग वर्कर्सना, फ्रीलान्सर्स आणि कंपन्यांना जोडणाऱ्या एका मार्केटप्लेससारखी होती. तेव्हा फ्रीलान्स कामं शोधणं अजून तितकं सोपं झालं नव्हतं. माझं तंत्रज्ञान उत्तम होतं, पण विक्री आणि मार्केटिंगची फारशी जाण नव्हती. 2017 मध्ये या प्लॅटफॉर्मला नवीन दिशा देऊन इंटर्नशिप आणि हायरिंग पोर्टल बनवलं. पण ज्या गोष्टी आज मार्केटमध्ये यशस्वी होत आहेत, त्या तेव्हा लोकांना समजत नव्हत्या. मार्केट तयार नव्हतं आणि...