"The Diary of a CEO" – पुस्तकाचा पंचनामा आणि शिकवण

आजकाल व्यवसाय, नेतृत्व, आणि यशस्वी होण्याच्या मार्गावर लिहिलेली अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण स्टीव्हन बार्टलेट लिखित The Diary of a CEO या पुस्तकात एक वेगळीच जादू आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ एका CEO चा अनुभव नसून, यश आणि अपयशाच्या मधल्या प्रवासाचं प्रामाणिक चित्रण आहे. व्यवसाय आणि नेतृत्व याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन हे पुस्तक वाचताना जाणवलं की, CEO होणं म्हणजे केवळ एक पद नाही, तर जबाबदारी, संघर्ष आणि शिकण्याचा अखंड प्रवास आहे. पुस्तकात स्टीव्हन बार्टलेट आपल्या कारकिर्दीतील मोठ्या चुका, योग्य निर्णय, आणि अनुभवांची मांडणी करतो, जी कोणत्याही व्यवसायिकाला आणि उद्योजकाला प्रेरणा देणारी आहे. पुस्तकातील महत्त्वाचे धडे यशाची संकल्पना बदलून टाका पुस्तक वाचताना लक्षात येतं की, यश म्हणजे केवळ पैसा किंवा प्रसिद्धी नाही. खरं यश म्हणजे मनःशांती, नातेसंबंध, आणि सातत्याने सुधारणा. आपण अनेकदा बाह्य यशाच्या मागे धावतो, पण आतून समाधानी असणं जास्त महत्त्वाचं आहे. अपयश पचवायचं असेल, तर अहंकार झुगारा स्टीव्हन सांगतो की, व्यवसायात अपयश अपरिहार्य आहे. पण अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच यश आणि अ...