ऍलन ट्युरिंग: आधुनिक संगणकशास्त्राचा जनक .


आज आपण उपयोगात आणत असलेला आधुनिक संगणक याची मूळ संकल्पना ऍलन ट्युरिंग या शास्त्रज्ञाची होती.ह्या महान शास्त्रज्ञाची जीवनाची पूर्वार्ध शांत आणि संयमी होती तेवढाच उत्तरार्ध निराशाजनक होता.ऍलन ट्युरिंग ह्या महान संगणक वैज्ञानिकाचा जन्म २३ जून १९१२ रोजी लंडन येथे झाला.त्याचे वडील भारतीय नागरी सेवेत असल्यामुळे त्याचे बालपण लंडनमधील त्याच्या नातेवाईकांकडे झाले.ऍलन ट्युरिंग हा ब्रिटीश गणितज्ञ ,संगणक वैज्ञानिक,तत्ववेत्ता,माहिती सुरक्षा शास्त्राचा जाणकार म्हणून इंग्लंड मध्ये फार प्रसिद्ध होता.









आज संगणक शास्त्रात सर्रास वापरत असलेला "अल्गोरीदम" याची मूळ संकल्पना  ऍलन ट्युरिंग याचीच होती .लहानपणापासून  ऍलन ट्युरिंग हा एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा विध्यार्थी म्हनून ओळखला जात असे.पण शाळेत असताना त्याच्या कडे पाहिजे तेवढे लक्ष दिल्या गेले नाही.ऍलन ट्युरिंग ने हुशारीचा कळस गाठला तो किंग्स कॉलेज कॅम्ब्रीज येथे दाखला घेतल्यानंतर.सन १९३६ मध्ये त्याने एक शोध प्रबंध मांडला त्यात त्याने एक सिद्धांत असा मांडला कि "वैश्विकरित्या एक यंत्र अस्तिवात असू शकते जे सर्व प्रकारचे प्रश्न त्यावर गणितीय प्रक्रिया करून सोडवू शकते ह्याच सिद्धांताला संगणक युगात नंतर "ट्युरिंग मशिन" म्हणून प्रसिद्धी मिळाली याच तत्वावर संगणक शास्त्राचा पाया रचला गेला.ट्युरिंग च्या अभ्यासामुळेच संगणक शास्त्राचे दोन ठळक विभाग पडले.पहिला विभाग मनजे 'सोडविता येणारे प्रश्न,माहित असलेल्या वेळेत ' (Decidability Problem) आणि दुसरा विभाग मनजे  'न सोडविता येणारे प्रश्न '(Un-Decidability Problem).कोणत्याही शास्त्राच्या प्रगतीसाठी त्याच्या मर्यादा हि लक्षात यायला हव्यात ,तेव्हाच  शास्त्रज्ञ त्यावर उपाय शोधू शकतात;आणि उत्तरोतर ते  शास्त्र प्रगती करत जात.ऍलन ट्युरिंग मुळे आपल्याला आजचा आधुनिक संगणक घडवता  आला आणि यशाची नवी शिखरे गाठता आली. दुसऱ्या  महायुद्धाच्या वेळेस ऍलन ट्युरिंग हा दोस्त राष्ट्राच्या सैन्यात माहिती सुरक्षा विभागात कार्य करायचा ,तिथे जर्मन सेनेची गूढ माहिती उकलण्याचे काम त्याला देण्यात आले होते. या कामात तो नेहमीच अग्रेसर राहायचा .त्यामुळे दोस्त राष्ट्रांना जर्मन सेनेची वित्तबातमी आधीच माहित झालेली असायची .तिथेच त्याने बोम्बी या नवीन विदुयत अभियांत्रिकी यंत्राची मुहुर्तवेढ रोवली .हे यंत्र त्याने जर्मनीच्या  एनिग्मा या यंत्राच्या तोडीस तोड बनवले होते.आज जगाच्या प्रगतीस संगणक कारणीभूत ठरला आणि पर्यायाने ऍलन ट्युरिंग हा जगप्रसिद्ध   शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला  .

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ऍलन ट्युरिंग याचे वैयक्तिक आयुष्य हे खाच-खळग्यानी भरलेले होतं .सन १९५२ मध्ये त्याच्यावर समलैंगिक असल्याचा आरोप ठेवण्यात आला.त्यावेळच्या सनातनी इंग्लंड मध्ये तो अक्षम्य असा गुन्हा होता , पण ट्युरिंगच्या  पूर्व प्रसिद्धीमुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा न करता ऐस्टोरजन इंजेक्शन (सेक्सची भावना मारणारे ) घेण्याची शिक्षा करण्यात आली ,याचाच परिणाम म्हणजे त्याच्यात नपुंसकता वाढीस लागली आणि एक प्रकारच्या नैराश्यतेने तो ग्रासल्या गेला .ह्याच निराशेच्या भरात या महान शास्त्रज्ञाने ७ जून १९५४ मध्ये सायनाइड हे अतिजहाल विष घेऊन आत्महत्या केली .त्याच्या मृतदेहाजवळ एक अर्धे  खालेलं सफरचंद पडलेलं होत .अशीहि एक आख्यायिका आहे कि त्या सफरचंदावरूनच स्टीव जॉब याला  अँपल ह्या त्याच्या कंपनीचा लोगो आणि नाव सुचलं.या महान  शास्त्रज्ञाची त्याच्या मृत्युनंतर हि परवड सुरूच राहली .त्याच्यावर अश्लील आरोप होत राहले ,त्याच्यावर असलेले गुन्हे मागे घेतल्या गेले नाहीत .






आणि सरतेशेवटी १० सप्टेंबर ,२००९ या दिवशी  ब्रिटीश प्रधानमंत्री गोर्डन ब्रोउन यांच्यातर्फे एक पत्र अधिकारीकरित्या  प्रसिद्ध  करण्यात आले त्या पत्राचा मसुदा असा होता कि  ' आम्हीं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांच्यावर ठेवलेले समलैंगिकतेचे सारे  गुन्हे मागे घेतो आणि ब्रिटीश सरकारच्या वतीने त्यांची जाहीररीत्या माफी मागतो' .

ऍलन ट्युरिंग याने आपल्या अल्पाआयुष्यात जगावर न फेडता येणारे उपकार करून ठेवले आहेत. आपण सर्व त्यांच्या ऋणातच  राहणे पसंद करू .हिच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल.

सचिन गवते  

© सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन  पूर्व परवानगी शिवाय कोणीही याचा वापर करू नये .






No comments: