प्रत्येक भारतीयाने वाचावे असे काही ..

पत्र लिहिण्यास कारण की....
माननीय,
मंत्री ,
महाराष्ट्र, भारत

विषय : इतका कमी शब्दात विषय मांडू शकत नाही ,त्यामुळे विषय वाचून पत्र फेकाण्यापैक्षा पूर्ण पत्र वाचावे ,


पत्र लिहिण्यास कारण की....
मी तसा बरा आहे ...
यंदा आपल्या कृपेने ,आत्महत्या कमी झाल्यात ..(जास्त जन उरलेच नाहीत आत्महत्या करायला ,आम्ही मोजके भित्रे बाकी आहोत फक्त ) ,
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही.. माझा मुलाला कपडे पुस्तक खेळणी तर नाही पण त्याला एक वेळेचे अर्धवट जेवण देन्याइत्पत हिरवेगार दु:ख माझ्या शेतात
उगवले आहेत ...पावूस कमी झाला यात तुमची काहीच चूक नाही ... घामाने जितके पिकवता आले तेवढे पिकवले ...
उधार मागायला सावकाराकडे जावू शकत नाही ..पोरगी आणि बायको सोडून गहाण ठेवण्यासारखे आता काहीच उरले नाही ...
माझ्या पोरीला माझा सदरा दिल्या मुळे ती सध्या आनंदात तर म्हणता येणार नाही पण खुश आहे कारण तिचे अंग ती आता झाकू शकते ...
बायको माझी अगदी शांत आहे ..एक ही शब्द बोलत नाही .. बसल्या बसल्या कधी उगीच रडून देते बस ...
तरी तुमच्या अमाप संपत्तीतून आम्हाला काही उधार द्यावे ही विनंती ...
आमचे लचके तोडून जमवलेली ती संपत्ती आहे ..............


आपला ....



बाबा अजून काही लिहायचं आहे .. मी पोराकडे बघत होतो ..त्यानेच हे पत्र लिहिले मी सांगितले मोजक्या शब्दात होते की काय लिहायचे आहे ..
तो पत्र वाचत होतो तेंव्हा डोळ्यात पाणी आलेले ..स्वताचा राग ही आलेला ..आणि थोडे बरे ही वाटले की पोरग हुशार आहे ...
मी त्याला जवळ घेतलं ..तनु पण आली माझ्या जवळ म्हणाली बाबा मीच शिकवले आहे त्याला ..आम्हाला शाळेत बसू देत नाही ना ..तर मी त्याला शिकवते ...
मी तिला ही जवळ घेतले ...बायको भरल्या डोळ्याने अश्रू लपविण्याचा प्रयत्न करीत होती ...
तिच्या साठी मुलां साठी जगेल आयला ...
त्यांना पाहिले की एक विश्वास येतो मनात ....
मी म्हटले मल्हार ला अजून एक वाक्य टाक पत्रात शेवटी ..
तो बोललो सांगा बाबा ..म्हटले लिही

"पत्र लिहिण्यास कारण की ...
मी तसा बरा आहे ..
मी लढेल .. "

हे एकूण २४ तास मनात मी मरेल ही भीती असलेली माझी बायको सुखावली थोडी ....
आणि ओरडली ..
पुरे झाले आता ..
काम करत नाही काय नाही ..
ये तनु गिळायला वाड त्यांना ....

-- आभार : फेसबुक समीक्षक

माझा नेता (विडंबन - कुसुमाग्रजासी स्मरूनी)




‘ओळखलत का साहेब मला?’ निवडणुकीआधी आला कोणी,
कपडे होते सफेद इस्रीवाले, गळ्यात हिरेजडित मनी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘निवडणूक तोंडावर आली, घ्या मला पाहुन’.

इकडे तिकडे पाहत हळूच त्यानी बाटली काढली,
मोकळ्या हाती जाईल कसा, एक नोटही माझ्या खिशात कोंबली.

निवडणूक झाली, महागाई वाढली, होते नव्हते गेले,
यालाच का मी मतदान केले म्हणत डोळ्यात पाणी तेव्हडे राहिले.

महागाइशी आता उर बडवून लढतो आहे
नेता मातुर माझा AC गाडीतून हिंडतो आहे.

गाऱ्हाणं माझा सांगाया दारी त्याच्या गेलो
दहा तास वाट पाहून घरी परत फिरलो

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
येवुदे पुढच्या निवडणुका, तुला घरीच बसवितो म्हणा!

साभार  - फेसबुक  थापाड्या ( Thapadya)

विरह व्याकूळ

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

' हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ , संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला , आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने...

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली


सचिन गवते

देशाची स्थिती

हि कविता मी २००६ मध्ये लिहिली होती पण सद्ध्या देशात सुरु असलेल्या परीस्तीतीचे ती चांगल्या प्रकारे वर्णन करू शकते. मनून ती आज २०११ मध्ये पोस्ट करतोय .


बापू तुमच्या वेळी असा होत
सचोटीची कास कोणी सोडत नव्हत ||१||

नितीमत्तेची होती लाज
आता आलाय सर्वाना माज ||२||

सचोटी ,नितीमत्ता अन शील
झाले हे गुण दुर्लभ ||३||

देशासाठी तुम्ही केली सर्वस्वाची होळी
अन आम्हा दिली स्वातंत्र्याची पोळी ||४||

आता रोज इथे सौदा होतो आहे
देशाच्या अखंडतेचा अन इभर्तीचा ||५||

टाकुनी नितीमत्ता गहाण
काढला विकायला देश आम्ही ||६||

सचोटीची चाळ हि कोणास नसे
पैसे खाणे हेच आमचे कर्म असे ||७||

मानतात लोक आताचे
जुने झाले तत्व बापूचे ||८||

सत्य, अहिंसा, परमोधर्म
आम्हाला कळत नसे त्याचे मर्म ||९||

खुंटली प्रगती देशाची
करुनी राजकारणे जातीची ||१०||

स्वप्न तुमचे अखंड भारत
योजिले आम्ही जातीय भारत ||११||

सचिन गवते

स्त्रीस



आज एकविसाव्या शतकात
स्वत:च्या सौंदर्याचा बाजार मांडलायस तू
फक्त दिखाव्याच्या जगात अडकलीयेस तू
मिस वर्ल्ड होण्याची स्वप्ने तू पाहतेस
त्यासाठी संस्कारांनाही पाने पुसतेस

तुझी काया पूर्वी असायची झाकण्यासाठी
आता धडपडतेस तू तीच दाखवण्यासाठी
स्त्री-मुक्तीच्या लढ्याची सोंगं करतेस
पण तू तर स्वच्छंदी मुक्ताच आहेस
आधीही होतीस आणि पुढेही राहशील!

तुझ्याचमुळे रामायण घडलं नि महाभारतही तुझ्याचमुळे!
तेव्हापासून तुझं महत्त्व आहे, तरी म्हणतेस मी बंधनात आहे!
स्वत:लाच इतकं स्वस्त केलंयेस तू
की shaving क्रीमच्या add मध्येही दिसलीच पाहिजेस तू
असलंच स्वातंत्र्य हवा होतं का तुला?

बुद्धी शक्तीच्या च्या जोरावर कितीही पुढे जा
पण तुझ्या शालीनतेला विसरू नकोस
समजूतदार होऊन नाती जोड, ती तोडू नकोस
तुझ्या उत्कर्षाआड येण्याची कोणाचीही हिंमत नाही
पण तूच स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नको

तुला देणगी आहे जिजाऊ बनण्याची,
राणी लक्ष्मी नि देवकी होण्याची
स्वत:ला घडवतानाच दुसऱ्यांना घडव
प्रेमाने सगळ्यांशी नातं जडव
तू आहेस म्हणूनच तर विश्व आहे
'आई' ही हाक ऐकण्याची संधी फक्त तुलाच आहे...

वपूर्झा

वपूर्झा
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.
स्वप्न
स्वप्न संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "
"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"
एकाकी
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण . एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्या वर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.
गगनभरारी
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो
त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यात्ल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.