आम्ही भारतीय कधी सुधारणार आहोत काय ???


हा प्रश्न माझा मलाच पडलाय.प्रश्नाचे औचित्य असे कि आज हनुमान जयंती चा उत्सव त्यानिमिताने गावो गावी आणि शहरात सुद्धा गल्लो गल्ली जेवणाच्या पंगती उठतायत भल्या मोठ्या आवाजात देवादिकांच्या आरत्या सुरु आहेत ,देव धर्म ,भक्ती ,श्रद्धा हा प्रश्न प्रत्येकाचा वयक्तिक आहे आणि एक व्यक्ती मनुन मी सुद्धा त्यात सामील आहे . पण आज शहरात फिरताना काही दृश्य दिसलीत त्यामुळे मन व्यथित झाले आणि आणि सायंकाळी घरी येताच हा लेख लिहायला घेतला .
दृश्य क्रमांक १ : जेवणाच्या पंगती सुरु आहेत आणि उष्ट्या पत्रावळी ,द्रोण ,पाणी पिण्याचे ग्लासेस (सर्व वस्तू प्लास्टिक च्या बनवलेल्या आहेत ) रस्त्यावर इतस्तता विखुरलेल्या आहे त्या कचऱ्याची जवाबदारी घ्यायला ना ते मंडळ तयार आहे न ते जेवण करणारे लोक .
दृश्य क्रमांक २: काही मंडळांची जेवणाची वेळ संपलेली आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जबरदस्ती ने थांबवून त्यांना महाप्रसाद वितरण करत आहेत , तुमची इच्छा असो व नसो तुम्हाला कितीही महत्वाचे काम असो तुम्हाला गाडी थांबवून ते घ्यावेच लागेल.इथे अन्नाची नासाडी होत आहे हा प्रश्न कोणाच्या लक्ष्यातहि येत नाही .
दृश्य क्रमांक ३: काही मंडळांचे कार्यकर्ते उष्ट्या पत्रावळी ,द्रोण ,पाणी पिण्याचे ग्लासेस उचलून नाल्यांमध्ये नेउन फेकत आहेत .त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजत आहेत ,आणि परिसरात दुर्घंधी पसरली आहे .
प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हेच सुरु आहे उत्सव कोणत्याही धर्माचा असो परिसराची,वातावरणाची ,पर्यावरणाची हानी सुरुच आहे .आज प्लास्टिक चा वापर इतका वाढलाय कि आम्ही कशाचाच विचार करायला तयार नाही पण आपली पृथ्वी जास्ती दिवस हा भर पेलू शकणार नाही तेव्हा वेळीच सावध व्हा .काही फोटोज ह्या लेखासोबत जोडलेले आहेत ते अवश्य बघावेत.
एक सामान्य नागरिक मनुन (आम आदमी ची टोपी न घालता ) मला याचा विचार करावासा वाटला आणि हे विचार तुमच्या पर्यंत पोहोचवासे वाटले
तुम्हाला वाटणार का ????
शेवटी काय,
देव आपला भक्ती आपली
पर्यावरण आपले
जगणे आपले
आणि मरणे हि आपले .
विचार करा !!!!
मूळ स्त्रोत :
सचिन गवते