आज १ मे महाराष्ट्र दिन ,कोणत्याही मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून यावा असा दिवस आजच्या दिवसी सन १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला.गुजरात आणि मध्य प्रांताचा मराठी भाषिक प्रदेश, मुंबई आनि विदर्भ सकट महाराष्ट्र या राज्याला जोडण्यात आला.१०५ हुतात्म्यांचा बळी घेऊन संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.आजही त्याचे भव्य स्मारक फ्लोरा फोन्तैन(हुतात्मा चौक) मुंबई इथे उभे आहे आज राज्याच्या स्थापनेला ५४ वर्ष पूर्ण होऊन हि काहि प्रश्न अनुत्तरीत आहे.आज ५४ वर्षानंतरही जी महाराष्ट्र धर्माची अस्मिता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली तिचा आम्ही आपल्या स्वार्थासाठी पार बट्ट्याबोळ करून टाकला आहे.आपल्या नवीन पिढीला महाराष्ट्र दिनाची फक्त सुट्टी माहीत आहे पण दिनाचे औचित्य त्यासाठी केलेला त्याग बलिदान याचा विसर पडला आहे.आज २०१४ साली विभागवार प्रांतरचना अस्तित्वात आलेली आहे.कोणी पश्चिम महाराष्ट्रवादी तर कोणी विदर्भवादी,तर कोणी खानदेशी किंवा कोंकणी.काही विभागांना विनासायास बडती मिळत आहे तर काही प्रदेशांचा अनुशेष दिवसेनदिवस वाडत चालला आहे .जेव्हा एकदा प्रांत नकाशावर अस्तित्वात येतो तेव्हा तो फक्त एक भौगोलिक प्रदेश नसतो ,तर तो जिवंत माणसांच्या अस्मिता,भाषेचा अभिमान, मराठी मनून वाटणारी आपुलकी ची भावना यांचा सर्वांग सुंदर मिलाप असतो.
भाषा हि एकाद्या राज्याला एकसंध मनून ठेवण्यात फार महत्वाची भूमिका बजावत असते;पण आज आम्हाला मराठी भाषेचा अभिमान वाटण्याऐवजी तिची लाज वाटते,आणि तिथेच एक मराठी मनून आपल्या पतनास सुरवात होते.भाषेचा अभिमान काय असतो याचे जिवंत उदाहरण मनजे शेजारील राज्य तामिळनाडू.तेथील हॉटेल व्यावसायिकापासून रिक्शा चालका पर्यंत प्रत्येकाचा तमिळचाच आग्रह असतो तमिळ किव्हा थोडी इंग्रजी या शिवाय ते दुसरी भाषा बोलायलाच तयार नसतात ,याही उपर त्याचे कारण विचारले असता मोठे मासलेवाईकच उत्तर देतात त्यांचे मत असे कि तुम्ही आपले राज्य सोडून आमच्या राज्यात आलात त्यामुळे तुम्हाला तामिळच बोलावी लागेल .याऊलट आपली स्थिती आहे नागपूर वा पुण्याचा व्यक्ती कोल्हापूरला गेला कि तो मराठी सोडून सरळ हिंदीवर घसरतो,आणि बाहेरील राज्यातला वक्ती महाराष्ट्रात आला कि आपण हिंदी किंव्हा इंग्रजी मध्ये संभाषण सुरु करतो .आपल्याला भाषेचा, प्रांताचा इथे राहणाऱ्या लोकांचा कसलाही अभिमान नाही त्यामुळेच कॉरपोरेट पासून चित्रपट व्यवसाया पर्यंत मराठी माणसाचा ठसा पाहिजे तसा उमटतच नाही (काही अपवाद जरूर आहेत).आम्ही फक्त दिन साजरा करतो आणि पूर्वजांच्या पुण्याईचे पोवाडे गातो . आमचा मराठी अस्मिता एकदम बोथड झाल्या आहेत. आता आम्हाला गरज आहे त्या अस्मिता पुन्हा चेतवण्याची. एक मराठी प्रांत मनून पुन्हा उभ राहण्याची .दिल्ली चे तख्त फोडणाऱ्या सदाशिवराव भाऊचे आपण वंशज आहोत हि गोष्ट आपण नेहमी स्मरणात ठेवावी .आपण बंडखोर मराठी रक्ताचे वारस आहोत फक्त गरज आहेत काही गोष्टी लक्षात ठेवण्याची .
१. एक मराठी मनून दुसऱ्या मराठी माणसाचा सन्मान करा.
२. आपल्या भाषेच्या सार्थ अभिमान बाळगा.
३. एकसंध महाराष्ट्र मानून प्रांताकडे बघा.
४. महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पक्का लक्षात ठेवा
५. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा .
इतके जरी तुम्ही प्रत्येक महाराष्ट्र दिनी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे , मनजे मला कोणाला महाराष्ट्र दिन का साजरा करतात ? याचे उत्तर द्यावे लागणार नाही .(ह्या मुळेच हा लेख प्रपंच). शेवटी लेखाचा शेवट कवी गोविंदाग्रजांच्या काही ओळी देऊन करतोय .
“अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा”
जय महाराष्ट्र !!!!!
सचिन गवते
No comments:
Post a Comment