व्यसन मुक्ती : शोध एका दिशेचा

आज आपल्या समाजात व्यसनांचा पगडा इतका जबरदस्त बसलाय कि त्याला एक प्रकारची प्रतिष्ठाच प्राप्त झाली आहे .तंबाकू पासून ते दारू पर्यंत सर्व व्यसनांनी आपल्या देशात अगदी मनसोक्त धुमाकूळ घातला आहे. व्यसनांची हि वर्गवारी असते जसे कि दिवसरात्र काबाड कष्ट करणारा मजूर हा त्याच्या ऐपतीप्रमाणे देसी गुत्या वर जाऊन दारू पितो ,तर पैश्याचा उत्तम स्त्रोत असलेला वक्ती थंड हवेत बसून इंग्रजी मद्य पितो.दोघांचीहि गुलामगिरी हि सारख्याच दर्जाची.


परवाच एक खेडेगावात गेलो असता  तेथील दृश्य एकदम विदारक होते.तिथे मुख्य चावडी पासून जवळच हनुमानाचे मंदिर होते अन त्याचा एकदम समोरच देशी दारू चे दुकान आणि बाजूलाच पानाच्या टपऱ्या आणि त्यात ते मशीन लावून खर्रा घोटणे सुरु.डोके एकदम बधीरच झाले.मनात मटले आता आम्हाला देवाचा हि विधीनिषेद उरला नाही.शहरी प्रदूषण खेड्यात केव्हा स्थिर झाले कळलेच नाही.एका बातमीनुसार भारतातील  एक प्रसिद्ध मद्य सम्राट  याचा धंदा प्रत्येक वर्षी २०-२५ टक्के दराने वाढत आहे कारण प्रत्येक वर्षी वयात  येणारी तरुण पिढी त्याचे ग्राहक बनत असते आणि जे पहिल्यापासून ग्राहक आहेत ते आयुष्यभर त्याचेच बनून राहतात. भारतात आजघडीला हा एकच धंदा असा आहे कि ज्याचा “रेव्येनु डेफीसिट” हा शून्य राहतो. सगळीच तरुणाई बिगडलीय अस अजिबात नाही.पण कुठेतरी गणित चुकतंय.बहुतांश तरुणांना व्यसनांनी आपल्या विळख्यात घेतलंय.सरकारे सुद्धा जनतेच हित करण्याकरिता काही लोकहितकारी निर्णय घेतें जशी महाराष्ट्रात सुरु असलेली गुटखा बंदी पण ती करताना त्याची आयात दुसऱ्या राज्यातून होत राहील व त्याच्यावर कोणताही निर्बंध राहील कि नाही याची शास्वती देत नाही.या सर्वामुळे केलेली मेहनत वायाच जाते. आज कुठल्याहि सरकारी कार्यालयात जा तिथल्या भिंतीवर तुम्हांला खर्रा किव्हा पान तंबाकूमुळे  अप्रतिम नक्षीकाम बगायला मिळेल. मी तर बगीतलय काही ऑफिसेस मध्ये काही महाभाग जागेवरून उठण्याच्या कंटाळा करतात आणि तिथेच डस्ट बिन मध्येच  घाण करतात ,काही लोक चालत्या ट्राफिक मध्ये सिग्नल वर काहीहि  न पाहता थुंकतात. या सर्व  गोष्टींमुळे ते स्वत बरोबर  समाजाचे आरोग्य सुद्धा धोक्यात टाकत असतात. पण याची फिकीर सुज्ञ मनवणाऱ्या व्यक्तींना नसते.या सर्व वाईट व्यसनांमुळे माणसाची निर्मितीक्षमताच गोठते.हे सर्व आपण थांबवु शकतो.फक्त गरज आहे द्रुढ इच्छा शक्तीची.माझ्या एका परिचयातल्या व्यक्तीला मी तंबाकू न खाण्या बद्दल सांगितले तर त्याने मला एक दोहाच ऐकवला.


“कृष्ण चालले वैकुंठासी
राधा विनवती पकडून बाही
इथे तंबाकू खा रे कान्हा
तिथे तंबाकू नाही"

यावर मी काय  बोलणार  ?
कोणत्याही मादक गोष्टीची सवय लागणे आणि व्यसन लागणे यात मुलभूत फरक आहे.पहिल्यांदा मित्राच्या संगतीने गंमत मनून व्यक्ती एकादी गोष्ट करून बघतो,आणि त्यामधल्या थ्रील ला बळी पडून वारंवार ती गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा शक्ती त्याच्या मध्ये जागृत होते.माझ्या मते हीच व्यसनाची पहिली पायरी आहे.या सर्वांमध्ये पैश्या बरोबर शरीराचीही नासाडी होते.ह्या सर्वांचा एकंदरीत परिणाम मणजे नैराश्य आणि उदासीनता वाढीस लागते.या सर्व वाईट सवयींमुळे काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात जसे कि कौटुंबिक हिंसाचार,गुन्हेगारी,अत्याचार .


जग पूर्णत व्यसनमुक्त करणे हे कदापीही शक्य नाही आणि यावर तात्कालिक उपाय हि उपयोगाचे नाही .यावर काही अंशी कामाचे ठरू शकेल असा एकमेव उपाय मणजे एकाद्या निर्व्यसनी माणसाने व्यसनी व्यक्तीचे मनपरिवर्तन करून त्याचे पुनर्वसन करणे ,त्याला परिणामांची जाणीव करून देणे आणि दीर्घ कालीन त्या व्यक्तीवर नजर ठेवणे; कारण कोणत्याही मानसिक ताणाखाली ती व्यक्ती पुन्हा त्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकते. जर आपल्याला एक सुद्रुढ समाज हवा असेल तर आपल्याला स्वताच्या कोशात न राहता व्यसनमुक्ती च्या जागृतीत सहभागी व्हावे लागेल हे एक संगठन करून करण्याचे काम आहे .या साठी सर्वांची साथ आवश्यक आहे. आपल्या समाजासाठी आपल्याला हि किंमत चुकती करावीच लागेल ,ह्या कमी मी तयार आहे ,तुम्ही तयार आहात काय?

सचिन गवते     
© सर्व हक्क सुरक्षित.  

No comments: