"आई "





आभाळातून फुटल्या पहिल्या-वहिल्याच
किरणाच्या कपाळीची रेखा ,
असलीच तर असेल माहित फक्त आभाळाला
त्या आभाळासारखी तू
ओंकाराचे सत्वसूर सुद्धा  राहिले  असतीलच कोंडून
केव्हा एकाद्या सप्नशील  गर्भात
 त्या समर्थ गर्भाची अधिकारी तू
असतात उद्याची रंग गंधमय फुले
ज्या कळी-कळीतून  पाकळ्या अवगुंठून
त्या अफुट कळ्यांना तरल स्पर्शाने  जागविणाऱ्या
शरदाच्या दहिवरल्या पहाट वाऱ्याची झुळूक तू
जे इथे जगतात  त्या सर्वांची  पायधूळ  मस्तकी झेलणाऱ्या
सर्वोदार धरित्री सारखी तू,
तू जिच्या पायठसांवर  उमटत  जातात
साहित्य संगीत नृत्य नाटक अश्या जीवनदायी
ललित कलांची पावन  राउळे
त्या मयुर-स्पर्शी शारदेची  लाडकी लेखच तू
वाहत्या गंगेला वाहन्यातला अर्थवाही अर्थ सांगणारी
हिमालयाला उंची सुद्धा पचवायला कानात पटविणारी  ,
जळताना हि जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला  देणारी
केवळ तूच !

तू नसतीस तर ?
या प्रश्नातच आहे तू असण्याचे निर्विवाद उत्तर
 तू कधीच नवतीस नाहीस आणि असणारही नाहीस
केवळ एक वक्ती व एक जीव ,
तर तू आहेस एक अतितापासून अनागा पर्यंतचे
एक जीवन सत्व
ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते ,,,,

"आई "


 (लेखक शिवाजी सावंत )