मित्रानो ;
एकाद्या सतारीची तार तुटावी तशी अखंड रात्रीची झोप तुटली वाटल, कि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे दिसामांजी काहीतरी लिहित जावे ,मनुन हा छोटासा प्रयास.
अस्वस्थ मनातील चांदणं
मनात विचारांचे काहूर उठलेत.... ,काहीतरी नवे करण्यासाठी मनाला वेड लागलंय एकसारख्या रुटीन चा कंटाळा आलाय . रोज काहीतरी नवे करूया या विचारानि जाग येते आणि आजचा दिवस उगाच वाया गेला असे मानत झोपेच्या स्वाधीन होतो ........
रात्रीच्या निरव शांततेत रातकिड्यांचे ध्वनी मनात कर्कश पिंगा घालत असतात .........
कधी वाटते हि अशी कशी कवी कल्पना .... आपल्याला काहीच कस सुचू नये ....
मन निगरगट्ट झाले कि भावनाच बोथड झाल्यात .....सवेदनांचा चंद्र मावळलाय ....मनाच्या कोनाड्यात दूर कुठे तरी अस्वस्थ चांदणं शिंपडलय.....कदाचित तेच कुठेतरी कल्पना शक्तीला अडसर निर्माण करतंय,मग जे लेखणीतून उतरतंय ती कोन्या नक्षत्राची देणगी आहे .....
विक्रीला ठेवलेला गुलाब जसा पाणी शिपंडल्यावर ताजतवान दिसतो .....तेच उसने अवसान मी रोज जगण्यात आणतो ,पण कुठेतरी मुळाशी नाळ तुटलेली आहे .......उदासीनता हि जर कल्पक मनाची अवस्था असेल तर ,,जगण्यातील सळसळती नशा हि सुद्धा कदाचित त्याच मनाची अवस्था आहे ,,, कदचित आज झालेला भ्रमनिरास उद्या नसेल ,निरभ्र आकाशात स्वैर संचार करणारे पक्षी हे कदाचित उद्या माझ्या सळसळत्या जगण्याची प्रेरणा असतील... त्याच आशेवर आजची रात्र घुसमट सहन करतोय ....उद्याच्या बेताल जगण्यासाठी .