आज एकविसाव्या शतकात
स्वत:च्या सौंदर्याचा बाजार मांडलायस तू
फक्त दिखाव्याच्या जगात अडकलीयेस तू
मिस वर्ल्ड होण्याची स्वप्ने तू पाहतेस
त्यासाठी संस्कारांनाही पाने पुसतेस
तुझी काया पूर्वी असायची झाकण्यासाठी
आता धडपडतेस तू तीच दाखवण्यासाठी
स्त्री-मुक्तीच्या लढ्याची सोंगं करतेस
पण तू तर स्वच्छंदी मुक्ताच आहेस
आधीही होतीस आणि पुढेही राहशील!
तुझ्याचमुळे रामायण घडलं नि महाभारतही तुझ्याचमुळे!
तेव्हापासून तुझं महत्त्व आहे, तरी म्हणतेस मी बंधनात आहे!
स्वत:लाच इतकं स्वस्त केलंयेस तू
की shaving क्रीमच्या add मध्येही दिसलीच पाहिजेस तू
असलंच स्वातंत्र्य हवा होतं का तुला?
बुद्धी शक्तीच्या च्या जोरावर कितीही पुढे जा
पण तुझ्या शालीनतेला विसरू नकोस
समजूतदार होऊन नाती जोड, ती तोडू नकोस
तुझ्या उत्कर्षाआड येण्याची कोणाचीही हिंमत नाही
पण तूच स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नको
तुला देणगी आहे जिजाऊ बनण्याची,
राणी लक्ष्मी नि देवकी होण्याची
स्वत:ला घडवतानाच दुसऱ्यांना घडव
प्रेमाने सगळ्यांशी नातं जडव
तू आहेस म्हणूनच तर विश्व आहे
'आई' ही हाक ऐकण्याची संधी फक्त तुलाच आहे...