व्यसन मुक्ती : शोध एका दिशेचा

आज आपल्या समाजात व्यसनांचा पगडा इतका जबरदस्त बसलाय कि त्याला एक प्रकारची प्रतिष्ठाच प्राप्त झाली आहे .तंबाकू पासून ते दारू पर्यंत सर्व व्यसनांनी आपल्या देशात अगदी मनसोक्त धुमाकूळ घातला आहे. व्यसनांची हि वर्गवारी असते जसे कि दिवसरात्र काबाड कष्ट करणारा मजूर हा त्याच्या ऐपतीप्रमाणे देसी गुत्या वर जाऊन दारू पितो ,तर पैश्याचा उत्तम स्त्रोत असलेला वक्ती थंड हवेत बसून इंग्रजी मद्य पितो.दोघांचीहि गुलामगिरी हि सारख्याच दर्जाची.


परवाच एक खेडेगावात गेलो असता  तेथील दृश्य एकदम विदारक होते.तिथे मुख्य चावडी पासून जवळच हनुमानाचे मंदिर होते अन त्याचा एकदम समोरच देशी दारू चे दुकान आणि बाजूलाच पानाच्या टपऱ्या आणि त्यात ते मशीन लावून खर्रा घोटणे सुरु.डोके एकदम बधीरच झाले.मनात मटले आता आम्हाला देवाचा हि विधीनिषेद उरला नाही.शहरी प्रदूषण खेड्यात केव्हा स्थिर झाले कळलेच नाही.एका बातमीनुसार भारतातील  एक प्रसिद्ध मद्य सम्राट  याचा धंदा प्रत्येक वर्षी २०-२५ टक्के दराने वाढत आहे कारण प्रत्येक वर्षी वयात  येणारी तरुण पिढी त्याचे ग्राहक बनत असते आणि जे पहिल्यापासून ग्राहक आहेत ते आयुष्यभर त्याचेच बनून राहतात. भारतात आजघडीला हा एकच धंदा असा आहे कि ज्याचा “रेव्येनु डेफीसिट” हा शून्य राहतो. सगळीच तरुणाई बिगडलीय अस अजिबात नाही.पण कुठेतरी गणित चुकतंय.बहुतांश तरुणांना व्यसनांनी आपल्या विळख्यात घेतलंय.सरकारे सुद्धा जनतेच हित करण्याकरिता काही लोकहितकारी निर्णय घेतें जशी महाराष्ट्रात सुरु असलेली गुटखा बंदी पण ती करताना त्याची आयात दुसऱ्या राज्यातून होत राहील व त्याच्यावर कोणताही निर्बंध राहील कि नाही याची शास्वती देत नाही.या सर्वामुळे केलेली मेहनत वायाच जाते. आज कुठल्याहि सरकारी कार्यालयात जा तिथल्या भिंतीवर तुम्हांला खर्रा किव्हा पान तंबाकूमुळे  अप्रतिम नक्षीकाम बगायला मिळेल. मी तर बगीतलय काही ऑफिसेस मध्ये काही महाभाग जागेवरून उठण्याच्या कंटाळा करतात आणि तिथेच डस्ट बिन मध्येच  घाण करतात ,काही लोक चालत्या ट्राफिक मध्ये सिग्नल वर काहीहि  न पाहता थुंकतात. या सर्व  गोष्टींमुळे ते स्वत बरोबर  समाजाचे आरोग्य सुद्धा धोक्यात टाकत असतात. पण याची फिकीर सुज्ञ मनवणाऱ्या व्यक्तींना नसते.या सर्व वाईट व्यसनांमुळे माणसाची निर्मितीक्षमताच गोठते.हे सर्व आपण थांबवु शकतो.फक्त गरज आहे द्रुढ इच्छा शक्तीची.माझ्या एका परिचयातल्या व्यक्तीला मी तंबाकू न खाण्या बद्दल सांगितले तर त्याने मला एक दोहाच ऐकवला.


“कृष्ण चालले वैकुंठासी
राधा विनवती पकडून बाही
इथे तंबाकू खा रे कान्हा
तिथे तंबाकू नाही"

यावर मी काय  बोलणार  ?
कोणत्याही मादक गोष्टीची सवय लागणे आणि व्यसन लागणे यात मुलभूत फरक आहे.पहिल्यांदा मित्राच्या संगतीने गंमत मनून व्यक्ती एकादी गोष्ट करून बघतो,आणि त्यामधल्या थ्रील ला बळी पडून वारंवार ती गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा शक्ती त्याच्या मध्ये जागृत होते.माझ्या मते हीच व्यसनाची पहिली पायरी आहे.या सर्वांमध्ये पैश्या बरोबर शरीराचीही नासाडी होते.ह्या सर्वांचा एकंदरीत परिणाम मणजे नैराश्य आणि उदासीनता वाढीस लागते.या सर्व वाईट सवयींमुळे काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात जसे कि कौटुंबिक हिंसाचार,गुन्हेगारी,अत्याचार .


जग पूर्णत व्यसनमुक्त करणे हे कदापीही शक्य नाही आणि यावर तात्कालिक उपाय हि उपयोगाचे नाही .यावर काही अंशी कामाचे ठरू शकेल असा एकमेव उपाय मणजे एकाद्या निर्व्यसनी माणसाने व्यसनी व्यक्तीचे मनपरिवर्तन करून त्याचे पुनर्वसन करणे ,त्याला परिणामांची जाणीव करून देणे आणि दीर्घ कालीन त्या व्यक्तीवर नजर ठेवणे; कारण कोणत्याही मानसिक ताणाखाली ती व्यक्ती पुन्हा त्या व्यसनांच्या आहारी जाऊ शकते. जर आपल्याला एक सुद्रुढ समाज हवा असेल तर आपल्याला स्वताच्या कोशात न राहता व्यसनमुक्ती च्या जागृतीत सहभागी व्हावे लागेल हे एक संगठन करून करण्याचे काम आहे .या साठी सर्वांची साथ आवश्यक आहे. आपल्या समाजासाठी आपल्याला हि किंमत चुकती करावीच लागेल ,ह्या कमी मी तयार आहे ,तुम्ही तयार आहात काय?

सचिन गवते     
© सर्व हक्क सुरक्षित.  

ऍलन ट्युरिंग: आधुनिक संगणकशास्त्राचा जनक .


आज आपण उपयोगात आणत असलेला आधुनिक संगणक याची मूळ संकल्पना ऍलन ट्युरिंग या शास्त्रज्ञाची होती.ह्या महान शास्त्रज्ञाची जीवनाची पूर्वार्ध शांत आणि संयमी होती तेवढाच उत्तरार्ध निराशाजनक होता.ऍलन ट्युरिंग ह्या महान संगणक वैज्ञानिकाचा जन्म २३ जून १९१२ रोजी लंडन येथे झाला.त्याचे वडील भारतीय नागरी सेवेत असल्यामुळे त्याचे बालपण लंडनमधील त्याच्या नातेवाईकांकडे झाले.ऍलन ट्युरिंग हा ब्रिटीश गणितज्ञ ,संगणक वैज्ञानिक,तत्ववेत्ता,माहिती सुरक्षा शास्त्राचा जाणकार म्हणून इंग्लंड मध्ये फार प्रसिद्ध होता.









आज संगणक शास्त्रात सर्रास वापरत असलेला "अल्गोरीदम" याची मूळ संकल्पना  ऍलन ट्युरिंग याचीच होती .लहानपणापासून  ऍलन ट्युरिंग हा एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा विध्यार्थी म्हनून ओळखला जात असे.पण शाळेत असताना त्याच्या कडे पाहिजे तेवढे लक्ष दिल्या गेले नाही.ऍलन ट्युरिंग ने हुशारीचा कळस गाठला तो किंग्स कॉलेज कॅम्ब्रीज येथे दाखला घेतल्यानंतर.सन १९३६ मध्ये त्याने एक शोध प्रबंध मांडला त्यात त्याने एक सिद्धांत असा मांडला कि "वैश्विकरित्या एक यंत्र अस्तिवात असू शकते जे सर्व प्रकारचे प्रश्न त्यावर गणितीय प्रक्रिया करून सोडवू शकते ह्याच सिद्धांताला संगणक युगात नंतर "ट्युरिंग मशिन" म्हणून प्रसिद्धी मिळाली याच तत्वावर संगणक शास्त्राचा पाया रचला गेला.ट्युरिंग च्या अभ्यासामुळेच संगणक शास्त्राचे दोन ठळक विभाग पडले.पहिला विभाग मनजे 'सोडविता येणारे प्रश्न,माहित असलेल्या वेळेत ' (Decidability Problem) आणि दुसरा विभाग मनजे  'न सोडविता येणारे प्रश्न '(Un-Decidability Problem).कोणत्याही शास्त्राच्या प्रगतीसाठी त्याच्या मर्यादा हि लक्षात यायला हव्यात ,तेव्हाच  शास्त्रज्ञ त्यावर उपाय शोधू शकतात;आणि उत्तरोतर ते  शास्त्र प्रगती करत जात.ऍलन ट्युरिंग मुळे आपल्याला आजचा आधुनिक संगणक घडवता  आला आणि यशाची नवी शिखरे गाठता आली. दुसऱ्या  महायुद्धाच्या वेळेस ऍलन ट्युरिंग हा दोस्त राष्ट्राच्या सैन्यात माहिती सुरक्षा विभागात कार्य करायचा ,तिथे जर्मन सेनेची गूढ माहिती उकलण्याचे काम त्याला देण्यात आले होते. या कामात तो नेहमीच अग्रेसर राहायचा .त्यामुळे दोस्त राष्ट्रांना जर्मन सेनेची वित्तबातमी आधीच माहित झालेली असायची .तिथेच त्याने बोम्बी या नवीन विदुयत अभियांत्रिकी यंत्राची मुहुर्तवेढ रोवली .हे यंत्र त्याने जर्मनीच्या  एनिग्मा या यंत्राच्या तोडीस तोड बनवले होते.आज जगाच्या प्रगतीस संगणक कारणीभूत ठरला आणि पर्यायाने ऍलन ट्युरिंग हा जगप्रसिद्ध   शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला  .

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ऍलन ट्युरिंग याचे वैयक्तिक आयुष्य हे खाच-खळग्यानी भरलेले होतं .सन १९५२ मध्ये त्याच्यावर समलैंगिक असल्याचा आरोप ठेवण्यात आला.त्यावेळच्या सनातनी इंग्लंड मध्ये तो अक्षम्य असा गुन्हा होता , पण ट्युरिंगच्या  पूर्व प्रसिद्धीमुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा न करता ऐस्टोरजन इंजेक्शन (सेक्सची भावना मारणारे ) घेण्याची शिक्षा करण्यात आली ,याचाच परिणाम म्हणजे त्याच्यात नपुंसकता वाढीस लागली आणि एक प्रकारच्या नैराश्यतेने तो ग्रासल्या गेला .ह्याच निराशेच्या भरात या महान शास्त्रज्ञाने ७ जून १९५४ मध्ये सायनाइड हे अतिजहाल विष घेऊन आत्महत्या केली .त्याच्या मृतदेहाजवळ एक अर्धे  खालेलं सफरचंद पडलेलं होत .अशीहि एक आख्यायिका आहे कि त्या सफरचंदावरूनच स्टीव जॉब याला  अँपल ह्या त्याच्या कंपनीचा लोगो आणि नाव सुचलं.या महान  शास्त्रज्ञाची त्याच्या मृत्युनंतर हि परवड सुरूच राहली .त्याच्यावर अश्लील आरोप होत राहले ,त्याच्यावर असलेले गुन्हे मागे घेतल्या गेले नाहीत .






आणि सरतेशेवटी १० सप्टेंबर ,२००९ या दिवशी  ब्रिटीश प्रधानमंत्री गोर्डन ब्रोउन यांच्यातर्फे एक पत्र अधिकारीकरित्या  प्रसिद्ध  करण्यात आले त्या पत्राचा मसुदा असा होता कि  ' आम्हीं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांच्यावर ठेवलेले समलैंगिकतेचे सारे  गुन्हे मागे घेतो आणि ब्रिटीश सरकारच्या वतीने त्यांची जाहीररीत्या माफी मागतो' .

ऍलन ट्युरिंग याने आपल्या अल्पाआयुष्यात जगावर न फेडता येणारे उपकार करून ठेवले आहेत. आपण सर्व त्यांच्या ऋणातच  राहणे पसंद करू .हिच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल.

सचिन गवते  

© सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन  पूर्व परवानगी शिवाय कोणीही याचा वापर करू नये .






राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा .

आज १ मे  महाराष्ट्र दिन ,कोणत्याही मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून यावा असा दिवस आजच्या दिवसी सन १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला.गुजरात आणि मध्य प्रांताचा मराठी भाषिक प्रदेश, मुंबई आनि विदर्भ सकट  महाराष्ट्र या राज्याला जोडण्यात आला.१०५ हुतात्म्यांचा बळी घेऊन संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.आजही त्याचे भव्य स्मारक फ्लोरा  फोन्तैन(हुतात्मा चौक) मुंबई इथे उभे आहे आज राज्याच्या स्थापनेला ५४ वर्ष पूर्ण होऊन हि काहि  प्रश्न अनुत्तरीत  आहे.आज ५४ वर्षानंतरही जी  महाराष्ट्र धर्माची अस्मिता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली तिचा आम्ही आपल्या स्वार्थासाठी पार बट्ट्याबोळ करून टाकला आहे.आपल्या नवीन पिढीला महाराष्ट्र दिनाची फक्त सुट्टी माहीत आहे पण दिनाचे औचित्य त्यासाठी केलेला त्याग बलिदान याचा विसर पडला आहे.आज २०१४ साली  विभागवार प्रांतरचना अस्तित्वात आलेली आहे.कोणी पश्चिम महाराष्ट्रवादी तर कोणी विदर्भवादी,तर कोणी खानदेशी किंवा कोंकणी.काही विभागांना विनासायास बडती मिळत आहे तर काही प्रदेशांचा अनुशेष दिवसेनदिवस वाडत चालला  आहे .जेव्हा एकदा प्रांत नकाशावर अस्तित्वात येतो   तेव्हा तो फक्त एक भौगोलिक प्रदेश नसतो ,तर तो जिवंत माणसांच्या अस्मिता,भाषेचा अभिमान, मराठी  मनून वाटणारी आपुलकी ची भावना यांचा सर्वांग सुंदर मिलाप असतो. 

भाषा हि एकाद्या राज्याला एकसंध मनून ठेवण्यात फार महत्वाची भूमिका बजावत असते;पण आज आम्हाला मराठी भाषेचा अभिमान  वाटण्याऐवजी तिची  लाज वाटते,आणि तिथेच एक मराठी मनून आपल्या पतनास सुरवात होते.भाषेचा अभिमान काय  असतो याचे जिवंत उदाहरण मनजे  शेजारील राज्य तामिळनाडू.तेथील हॉटेल व्यावसायिकापासून रिक्शा चालका पर्यंत प्रत्येकाचा तमिळचाच आग्रह असतो तमिळ किव्हा थोडी इंग्रजी या शिवाय ते दुसरी भाषा बोलायलाच तयार नसतात ,याही उपर त्याचे कारण विचारले असता मोठे मासलेवाईकच उत्तर देतात त्यांचे मत असे कि तुम्ही आपले राज्य सोडून आमच्या राज्यात आलात त्यामुळे तुम्हाला तामिळच बोलावी लागेल .याऊलट आपली स्थिती आहे नागपूर वा पुण्याचा व्यक्ती कोल्हापूरला गेला कि तो मराठी सोडून सरळ हिंदीवर घसरतो,आणि बाहेरील राज्यातला वक्ती महाराष्ट्रात आला कि आपण हिंदी किंव्हा इंग्रजी मध्ये संभाषण सुरु करतो .आपल्याला भाषेचा, प्रांताचा इथे राहणाऱ्या लोकांचा  कसलाही अभिमान नाही त्यामुळेच कॉरपोरेट पासून चित्रपट व्यवसाया पर्यंत मराठी माणसाचा ठसा पाहिजे तसा उमटतच नाही (काही अपवाद जरूर आहेत).आम्ही फक्त दिन साजरा करतो आणि पूर्वजांच्या पुण्याईचे पोवाडे गातो . आमचा मराठी अस्मिता एकदम बोथड झाल्या आहेत. आता आम्हाला गरज आहे त्या अस्मिता पुन्हा चेतवण्याची. एक मराठी प्रांत मनून पुन्हा उभ राहण्याची .दिल्ली चे तख्त फोडणाऱ्या सदाशिवराव भाऊचे आपण वंशज आहोत हि गोष्ट आपण नेहमी स्मरणात ठेवावी .आपण बंडखोर मराठी रक्ताचे वारस आहोत फक्त गरज आहेत काही गोष्टी लक्षात ठेवण्याची .

१.      एक मराठी मनून दुसऱ्या मराठी माणसाचा सन्मान करा.

२.      आपल्या भाषेच्या सार्थ अभिमान बाळगा.

३.      एकसंध महाराष्ट्र मानून प्रांताकडे बघा.

४.      महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पक्का लक्षात ठेवा

५.      आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा .                                 


  इतके जरी तुम्ही प्रत्येक महाराष्ट्र दिनी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे , मनजे मला कोणाला महाराष्ट्र दिन का साजरा करतात ? याचे उत्तर द्यावे लागणार नाही .(ह्या मुळेच हा लेख प्रपंच).  शेवटी लेखाचा शेवट  कवी गोविंदाग्रजांच्या काही ओळी देऊन करतोय .


“अपार सिंधुच्या भव्य बांधवा , महाराष्ट्र देशा

सह्याद्रीच्या सख्या , जिवलगा , महाराष्ट्र देशा

मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा”



जय महाराष्ट्र !!!!!

सचिन गवते