नवसाचा बोकड

रविवार मंजे आठवडाभर कामाच्या पाट्या टाकल्यानंतर येणारा आळसावलेला दिवस ,ह्या दिवसाची सुरवात नेहमीपेक्षा जर वेगळीच होते मागील रविवारी अचानक आतेभावाचा फोन आला तो त्याच्या कडील नवसाचे आमंत्रण देण्यासाठी. मी पण रविवारची सुट्टी असल्यामुळे    काहीही आढेवेढे न घेता तयार झालो .मजल दरमजल करत एकदाचा नवसाच्या ठिकाणी पोहचलो .तिथे गेल्यानंतर तिथले दृश्य पाहून मन अगदी विष्णन झाले ,एकीकडे देवाची पूजा सुरु होती दुसरीकडे कापलेला बोकड सोलणे सुरु होते तर तिसरीकडे जुगाराचा डाव अगदी रंगात आला होता.देवस्थानच्या  विस्तीर्ण परिसरात हाडांचा खच,कोबड्यांचे पंख विखुरलेले होते ,बळी दिलेल्या बोकडांचे पाय चिंचेच्या झाडाला लटकत होते निरनिराळ्या  झाडाला भक्तांनी मुलांच्या आशेने अर्पण केलेले छोटे पाळणे लटकत होते ,काही वयस्क पुरुष  पिण्याच्या कामी लागले होते. ते मद्यपान आणि जुगार इतक्या इर्षेने करत होते कि ते फक्त तेवढ्या साठीच तिथे आल्याचा भास निर्माण होत होता .


असल्या परिस्थितीत कसला नवस अन कसलं काय ? मला तर ति फक्त संडे-पार्टीच वाटली.

कोणत्याही प्रश्नाची कारणमीमांसा न करता आपण कोणत्यातरी देवाला नवस बोलतो ,आणि ऐपत असो व नसो तो फेडण्यासाठी कर्जबाजारी होतो.माझ्या मते देव हा जर सृष्टीचा पिता आणि पालनकर्ता असेल तर त्याचीच संतती मंजे आपण कापलेला बोकडाच्या रक्ताने खुश कसा काय  होणार??एकविसाव्या शतकातही आपण पार या अंधश्रद्धाच्या नादी लागलेलो आहोत .साढे तीनशे वर्षा पहिले तुकाराम महाराज सांगून  गेले कि

शेंदूर फासून दगडासी
नवस बोलते तयासी
नवस-सायासे पोरे होती
तर का करणे लागते पती .

पण आपण दैववाद आणि चंगळवाद यांची सरमिसळ करून टाकली आहे,आणि काहीही तर्कसंगत विचार न करता अंधश्रद्धाच्या नादी लागलेलो आहोत
माझ्या मते भारताला सुपरपावर बनवायचा असेल तर आपल्याला नवीन पिढी हि  विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत विचार करणारी घडवावी लागेल  पण आज आपल्या समाजात हो परिस्थिती फार धुसर होते आहे. काही लोकं त्यांना येणाऱ्या समस्यांची उकल न करता दैववाद आणि आशावाद यांच्या मागे लागले आहेत  .हि परिस्थिती सुधारणे समाजाच्या हितासाठी जरुरी आहे .
नाहीतर शेवटी काय ;

शेळी जाते जीवानिशी
अन खाणारे  मनतात
मऊ कशी लागेना .

ह्या सर्व विचार मंथना नंतर उरते काय तर ,

प्रश्न आणि प्रश्न ??


-:लेखक (सचिन गवते)

"आई "





आभाळातून फुटल्या पहिल्या-वहिल्याच
किरणाच्या कपाळीची रेखा ,
असलीच तर असेल माहित फक्त आभाळाला
त्या आभाळासारखी तू
ओंकाराचे सत्वसूर सुद्धा  राहिले  असतीलच कोंडून
केव्हा एकाद्या सप्नशील  गर्भात
 त्या समर्थ गर्भाची अधिकारी तू
असतात उद्याची रंग गंधमय फुले
ज्या कळी-कळीतून  पाकळ्या अवगुंठून
त्या अफुट कळ्यांना तरल स्पर्शाने  जागविणाऱ्या
शरदाच्या दहिवरल्या पहाट वाऱ्याची झुळूक तू
जे इथे जगतात  त्या सर्वांची  पायधूळ  मस्तकी झेलणाऱ्या
सर्वोदार धरित्री सारखी तू,
तू जिच्या पायठसांवर  उमटत  जातात
साहित्य संगीत नृत्य नाटक अश्या जीवनदायी
ललित कलांची पावन  राउळे
त्या मयुर-स्पर्शी शारदेची  लाडकी लेखच तू
वाहत्या गंगेला वाहन्यातला अर्थवाही अर्थ सांगणारी
हिमालयाला उंची सुद्धा पचवायला कानात पटविणारी  ,
जळताना हि जगाला उजळण्याचा तेजोमंत्र सूर्याला  देणारी
केवळ तूच !

तू नसतीस तर ?
या प्रश्नातच आहे तू असण्याचे निर्विवाद उत्तर
 तू कधीच नवतीस नाहीस आणि असणारही नाहीस
केवळ एक वक्ती व एक जीव ,
तर तू आहेस एक अतितापासून अनागा पर्यंतचे
एक जीवन सत्व
ज्याचे एकमेव नाव आहे व असू शकते ,,,,

"आई "


 (लेखक शिवाजी सावंत )

सत्तांतर

सत्तेसाठी होणार्‍या एका वेगळ्याच संघर्षाची कहाणी





काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो.

ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात.

संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.


आम्ही भारतीय कधी सुधारणार आहोत काय ???


हा प्रश्न माझा मलाच पडलाय.प्रश्नाचे औचित्य असे कि आज हनुमान जयंती चा उत्सव त्यानिमिताने गावो गावी आणि शहरात सुद्धा गल्लो गल्ली जेवणाच्या पंगती उठतायत भल्या मोठ्या आवाजात देवादिकांच्या आरत्या सुरु आहेत ,देव धर्म ,भक्ती ,श्रद्धा हा प्रश्न प्रत्येकाचा वयक्तिक आहे आणि एक व्यक्ती मनुन मी सुद्धा त्यात सामील आहे . पण आज शहरात फिरताना काही दृश्य दिसलीत त्यामुळे मन व्यथित झाले आणि आणि सायंकाळी घरी येताच हा लेख लिहायला घेतला .
दृश्य क्रमांक १ : जेवणाच्या पंगती सुरु आहेत आणि उष्ट्या पत्रावळी ,द्रोण ,पाणी पिण्याचे ग्लासेस (सर्व वस्तू प्लास्टिक च्या बनवलेल्या आहेत ) रस्त्यावर इतस्तता विखुरलेल्या आहे त्या कचऱ्याची जवाबदारी घ्यायला ना ते मंडळ तयार आहे न ते जेवण करणारे लोक .
दृश्य क्रमांक २: काही मंडळांची जेवणाची वेळ संपलेली आहे त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जबरदस्ती ने थांबवून त्यांना महाप्रसाद वितरण करत आहेत , तुमची इच्छा असो व नसो तुम्हाला कितीही महत्वाचे काम असो तुम्हाला गाडी थांबवून ते घ्यावेच लागेल.इथे अन्नाची नासाडी होत आहे हा प्रश्न कोणाच्या लक्ष्यातहि येत नाही .
दृश्य क्रमांक ३: काही मंडळांचे कार्यकर्ते उष्ट्या पत्रावळी ,द्रोण ,पाणी पिण्याचे ग्लासेस उचलून नाल्यांमध्ये नेउन फेकत आहेत .त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजत आहेत ,आणि परिसरात दुर्घंधी पसरली आहे .
प्रत्येक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हेच सुरु आहे उत्सव कोणत्याही धर्माचा असो परिसराची,वातावरणाची ,पर्यावरणाची हानी सुरुच आहे .आज प्लास्टिक चा वापर इतका वाढलाय कि आम्ही कशाचाच विचार करायला तयार नाही पण आपली पृथ्वी जास्ती दिवस हा भर पेलू शकणार नाही तेव्हा वेळीच सावध व्हा .काही फोटोज ह्या लेखासोबत जोडलेले आहेत ते अवश्य बघावेत.
एक सामान्य नागरिक मनुन (आम आदमी ची टोपी न घालता ) मला याचा विचार करावासा वाटला आणि हे विचार तुमच्या पर्यंत पोहोचवासे वाटले
तुम्हाला वाटणार का ????
शेवटी काय,
देव आपला भक्ती आपली
पर्यावरण आपले
जगणे आपले
आणि मरणे हि आपले .
विचार करा !!!!
मूळ स्त्रोत :
सचिन गवते